महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छेड काढणार्‍या टवाळखोराला मुलींनी दिला चोप - हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार

हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. इतकी मोठी घटना घडूनही अद्यापही महिला संरक्षणच्या बाबतीत ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळेच महिलांना टवाळखोरांचा बंदोबस्त करावा लागतो आहे. अशाच एका टवाळखोरांचा उस्मानाबादमध्ये मुलींनी बंदोबस्त केला. विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला मुलींनी चांगलाच चोप देऊन  पोलिसांच्या ताब्यात दिले.

osmanabad
छेड काढणार्‍या टवाळखोराला मुलींनी दिला चोप

By

Published : Dec 19, 2019, 10:58 PM IST


उस्मानाबाद -हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणी संपूर्ण देश हादरला आहे. इतकी मोठी घटना घडूनही अद्यापही महिला संरक्षणच्या बाबतीत ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळेच महिलांना टवाळखोरांचा बंदोबस्त करावा लागतो आहे. अशाच एका टवाळखोरांचा उस्मानाबादमध्ये मुलींनीच बंदोबस्त केला. विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला मुलींनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

शहरातील रामकृष्ण परमहंस कॉलेजचे भोसले हायस्कूल परिसरामध्ये टवाळखोरांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातून तसेच शहरातील मुले मुली येथे शिक्षणासाठी येतात. त्याचबरोबर या भागांमध्ये खाजगी कोचिंग क्लासेसचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या परिसरामध्ये छेडछाडीचे प्रमाण अधिक आहे. शाळा सुटण्याच्या दरम्यान एका विद्यार्थिनीची टवाळखोराने छेड काढली. मात्र, ही टवाळकी या मुलाच्या चांगलीच अंगलट आली. या टवाळखोराला मुलीसह तिच्या पालकांनी व तिथे उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सदर विद्यार्थीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पकडलेल्या टवाळखोरावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे मुलीचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details