उस्मानाबाद - कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीनं कैवारी शिवशंकर (बप्पा) घोंगडे पत्रकार पेंन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागात राहून तिथलो प्रश्न मांडणारे, स्थानिक विकासा कामांत महत्वाची भूमीका पार पाडणारे, प्रसंगी पदरमोड करून सामाजीक बांधिलकी जपणार्या ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या लक्षात घेता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
कळंब पत्रकार संघाची पेन्शन योजना; महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीनं कैवारी शिवशंकर (बप्पा) घोंगडे पत्रकार पेंन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागात राहून तिथलो प्रश्न मांडणारे, स्थानिक विकासा कामांत महत्वाची भूमीका पार पाडणारे, प्रसंगी पदरमोड करून सामाजीक बांधिलकी जपणार्या ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या लक्षात घेता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
वृत्तपत्र मानधन देत नाहीत आणि एकीकडं समाजाच्या पत्रकारांकडून ढिगभर अपेक्षा आहेत. अशा चरख्यात ग्रामीण पत्रकार भरडून निघत आहे. शासन पत्रकारांच्या पेंन्शनाबाबत उदासीन आहे. ही गोष्ट गांभीर्यानं घेत कळंब तालुका पत्रकार संघाची पञकार बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. यात वयोवृद्ध पत्रकारांचा विचार करत. पञकारांना काही मदत करण्याचा प्रस्ताव पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे यांनी मांडला. याला अशोक शिंदे यांनी अनुमोदन दिलं. यावेळी कैवारी शिवशंकर (बप्पा) घोंगडे पत्रकार पेंन्शन योजना चालू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
प्रती वर्ष 5 हजार रूपये पेंन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात ही रक्कम वाढवण्यात येणार आहे. ५५ वर्ष व पत्रकारितेतील सातत्य असे निकष यासाठी ठेवण्यात आले आहेत. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शितलकुमार घोंगडे, माधवसिंग राजपूत, मंगेश यादव, अमर चोंदे, विशाल कुंभार, बालाजी सुरवसे, शिवप्रसाद बियाणी, परवेज मुल्ला, रमेश आंबिरकर, सतीश मातने, परमेश्वर पालकर, आदी उपस्थित होते.