महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! तुळजापुरात 'शेवाळ'युक्त पाण्यातून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश संकटात सापडला असून, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता जास्त आहे.

tuljapur
तुळजापुरात 'शेवाळ'युक्त पाण्यातून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

By

Published : Jul 19, 2020, 2:03 AM IST

Updated : Jul 19, 2020, 6:28 AM IST

उस्मानाबाद - तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात कोरोना संशयित रुग्णांना 'शेवाळयुक्त' पाण्यातून ऑक्सिजन पुरवठा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ 'ई टीव्ही भारत'च्या हाती लागला आहे. ह्युमिडीटी फायर (काचेचे भांडे) मध्ये असलेल्या पाण्यामध्ये शेवाळ साचले असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याच माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात असून, रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तुळजापुरात 'शेवाळ'युक्त पाण्यातून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

हेही वाचा -खुशखबर.. डिसेंबरपर्यंत राज्यात पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदांची भरती

यासंदर्भात 'ई टीव्ही भारत'ने ऑक्सिजन तज्ज्ञांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, रुग्णांना ड्राय ऑक्सिजन सहन होणार नाही त्यामुळे ऑक्सिजनची आद्रता वाढवून पाण्याच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो. हे पाणी शुद्ध असायला हवे. रुग्ण बरा झाल्यानंतर या ह्युमिडीटी फायर (काचेचे भांडे) मधील पाणी बदलायला हवे. त्याचबरोबर या ह्युमिडीटी फायरमधील पाण्याचा वापर करण्यात आला नसला तरीही दहा दिवसानंतर पाणी बदलणे गरजेचे असल्याचे ऑक्सिजन तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय शेवाळ साचलेल्या पाण्यामधून ऑक्सिजन पुरवठा करत असल्याने रुग्णालयाचा गलथानपणा समोर आला आहे.

हेही वाचा -राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी कोरोनाबाधित; औरंगाबाद येथे उपचार सुरू

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश संकटात सापडला असून, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता जास्त आहे. असे असताना देखील अशुद्ध पाण्यातून ऑक्सिजन पुरवठा केला जात असून, याबाबतीत रुग्णालय प्रशासन गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Last Updated : Jul 19, 2020, 6:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details