उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील गंजोटी येथील महिलांनी सेंद्रिय भाजीपाल्यापासून पोषणमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री ( Gunjoti women food business story ) करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या शेवयाला आता मागणी वाढू लागली आहे. या महिला वर्षाला 7 लाखांची कमाई करत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ( Maharashtra State Rural Development Mission ) या महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला विविध योजनांचा लाभ घेत व्यवसायात भरारी घेत आहेत. उमरगा तालुक्यातील गुंजोटी गावातील महिलानी एक नव्हे तर 21 प्रकारच्या पौष्टिकमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री करण्याचा उद्योग सुरू केला आहे. या शेवयाची मागणी वाढत असून वर्षाकाठी या महिला 7 लाखांचे उत्पन्न मिळवत आहे.
मॅगीसारख्या फास्टफूडला पर्याय, पौष्टिक शेवया -फास्टफूडमुळे अनेकांना आरोग्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील गंजोटी येथील महिलांनी सेंद्रिय भाजीपाल्यापासून पोषणमूल्य असलेल्या शेवया तयार करून विक्री ( Gunjoti women food business story ) करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या शेवयाला आता मागणी वाढू लागली आहे. या महिला वर्षाला 7 लाखांची कमाई मिळवित आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प ( National Rural Economic Transformation Project ) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून या महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत केली जात आहे. 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन उद्योग योजना ' तसेच 'सही पोषण देश रोशन'अंतर्गत व्यवसाय करण्यात येत ( Nutrition food for women and girls ) आहे.