महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहतूक शाखेची गांधीगिरी कारवाई; नियम मोडणाऱ्या लोकांना दिले गुलाबाचे फुल

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीवर काही नियम लादले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली.

osmanabad
osmanabad

By

Published : Aug 3, 2020, 2:10 PM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे सरकारने विविध नियम लावले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचेही गुलाबपुष्प देत सत्कार करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी दुचाकी बंदीचे आदेश जाहीर केले होते. त्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गुलाबाचे फुल देऊन नियम मोडणाऱ्याचा सत्कार करत भन्नाट अशी कारवाई केली.

आता याचा उस्मानाबादकरांवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details