महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 17, 2021, 3:30 PM IST

Updated : Nov 17, 2021, 4:11 PM IST

ETV Bharat / state

CROP LOAN ISSUE एसबीआय मॅनेजरकडून पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची पिळवूणक; खासदार ओमराजे निंबाळकरांनी घेतला समाचार

शेतकऱ्यांच्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी थेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन संबंधित व्यवस्थापकाला खडसावले. या पुढील काळात असे उद्योग करू नका, अशी जाहीर तंबी दिली आहे. विमा पॉलिसी न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर फाईल फेकली जात होती.

उस्मानाबाद खासदार ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद खासदार ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत (Osmanabad State Bank branch) पीककर्जाकरिता शेतकऱ्यांची पिळवूणक केली जात असल्याचा आरोप होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे खासदार ओमराजे निंबाळकर (Osmanabad MP Omraje Nimbalkar) यांच्या समोर मांडले. या गोष्टीची दाखल घेतल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक शेतकऱ्यांना 10 हजारांचा विमा घेण्याची (compulsory insurance for crop loan in Osmanabad) सक्ती करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यांनी बँक व्यवस्थापकाला झापले.

१० हजार रुपयांची विमा पॉलिसी घ्या, तरच पीक कर्ज मंजूर केले जाईल, अशी एसबीआयचे व्यस्थापक विजय कांबळे (SBI Manager Vijay Kamble) शेतकऱ्यांना सक्ती करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तसेच विमा पॉलिसी न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर फाईल फेकली जात होती. स्टेट बँकेचे व्यवस्थापक विजय कांबळे यांची ही मुजोरी (Osmanabad State Bank branch controversy) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उघड केली आहे.

एसबीआय मॅनेजरकडून पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची पिळवूणक

हेही वाचा-500 CR scam : मराठवाड्यात 30-30 नावाचा 500 कोटींचा घोटाळा, बिडकीन पोलिसात पहिला गुन्हा दाखल

शेतकऱ्यांच्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी थेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन संबंधित व्यवस्थापकाला खडसावले. या पुढील काळात असे उद्योग करू नका, अशी जाहीर तंबी दिली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बँक मॅनेजर कांबळे यांना विचारणा केली. तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की, जीवन विमासाठी पैसे दिले नाही तर तोंडावर चक्क पीक कर्जाची फाईल फेकून दिली जाते.

हेही वाचा-inflation india 2021 : 30 टक्क्यांनी वाढणार लग्नसोहळ्यातील पंगतीचा खर्च!

दोषींवर कारवाई करण्याच्या खासदारांच्या सूचना

बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांकडून जीवन विम्याची कपात करण्यात आली आहे. त्या सर्वांचा जबाब नोंदविण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मर्जीप्रमाणे बँक व्यवस्थापकांनी कपात केली आहे का? (MP Omprakash Nimbalkar raised questions on crop loan distribution) त्यांची अडवणूक करून जीवन विमाचे पैसे दिले तरच पीक कर्ज देण्यात येते का ? याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश खासदार निंबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. शेतकरी बँकेचे कर्ज घेऊन भरतो. त्यामुळे बँकेचे कामकाज चालते. सरकारने पगारी देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कर्मचाऱ्यांना बँकेत बसविले आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळावे व पतपुरवठा व्हावा, हा मागचा शुद्ध हेतू आहे.

हेही वाचा-'स्वातंत्र्य २०१४ साली मिळाल्याचा साक्षात्कार गांजाड्यांना झाला', सामनातून कंगनाची यथेच्छ धुलाई

शेतकऱ्यांना संपर्क करण्याचे खासदार निंबाळकर यांचे आवाहन

खासदार ओमप्रकाश निंबाळकर म्हणाले, की अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांवर (Supreme court Suo Moto on SBI employees behavior) ताशेरे ओढले आहेत. बँकेत येणाऱ्या ग्राहकाला कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित वागणूक मिळत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे. हाच अनुभव जिल्ह्यात शेतकऱ्यांना येत आहे. कोणत्याही राष्ट्रीय बँकेत जर अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या पीककर्जातून कपात होत असेल तर (crop loan issue) थेट संपर्क साधण्याचे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.

Last Updated : Nov 17, 2021, 4:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details