महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपकडून उस्मानाबाद लोकसभा जागेवर केलेला दावा अखेर मागे

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या पक्षांनी उस्मानाबाद लोकसभेच्या जागेसाठी  प्रचंड रस्सीखेच सुरू केली केली होती. लोकसभेची जागा राष्ट्रवादी व शिवसेनेकडे आहे.

ओमप्रकाश राजेनिंबाळकर

By

Published : Mar 26, 2019, 12:44 PM IST

उस्मानाबाद -काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या पक्षांनी उस्मानाबाद लोकसभेच्या जागेसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू केली केली होती. लोकसभेची जागा राष्ट्रवादी व शिवसेनेकडे आहे. मात्र, या जागेवर मित्रपक्षांनी दावा केल्यामुळे येथील उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत सस्पेन्स कायम होता.

अर्जून खोतकर आणि आमदार सुजितसिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया

उस्मानाबाद लोकसभेसाठी भाजपकडे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर काँग्रेसकडून शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव चर्चेत होते. आमदार ठाकूर यांनी केलेल्या या दाव्यामुळे सेनेत आणखी थोडा संभ्रम निर्माण झाला होता.

ऐन शेवटच्या टप्प्यात शिवसेनेकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. त्यामुळे आता सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेनेला पूर्ण मदत करू असे घोषित केले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणू असे प्रतिपादन ठाकूर यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details