महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्याची ऐन दिवाळीत आत्महत्या, सोयाबीनचा उतार कमी आल्याने उचलले टोकाचे पाऊल - उस्मानाबाद शेतकरी आत्महत्या

तीन वेळा सोयाबीनची पेरणी करुन देखील सोयाबिनला उतार मिळाला नाही. त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील लासोना येथील अल्पभुधारक शेतकरी सल्लाउद्दीन गुलाब शेख हे निराश होते. लोकांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी झाडाला फाशी घेऊन आयुष्य ( Farmers suicide in Diwali ) संपविले आहे.

उस्मानाबाद शेतकरी
उस्मानाबाद शेतकरी

By

Published : Oct 26, 2022, 6:17 AM IST

उस्मानाबादमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन करूनही शेतकऱ्यांना धीर मिळालेला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याने ऐन दिवाळीत आत्महत्या केली आहे. सल्लाउद्दीन गुलाब शेख असे आत्महत्या केलेल्या ( Osmanabad farmer suicide ) शेतकऱ्याचे नाव आहे.

तीन वेळा सोयाबीनची पेरणी करुन देखील सोयाबिनला उतार ( less Soybean production in farm ) मिळाला नाही. त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील लासोना येथील अल्पभुधारक शेतकरी सल्लाउद्दीन गुलाब शेख हे निराश ( farmers issue in Osmanabad ) होते. लोकांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून त्यांनी झाडाला फाशी घेऊन आयुष्य संपविले आहे.



१ एकर शेतामध्ये ३ वेळा सोयाबिनची पेरणीउस्मानाबाद जिल्हयात सतत पडणारा पाऊस ( Farmers suicide in Diwali ) आणि सोयाबीनवर आलेल्या शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव आणि यलो मोझँकच्या अटँकमुळे शेतकरी अडचणीत आहेत. सोयाबिनचा उतार कमी आला आहे. सल्लाउद्दीन शेख यांची स्वतःची एक एकर जमीन होती. आपली जमीन कसून ते दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणुन कामाला होते. सल्लाउद्दीन यांनी त्यांच्या १ एकर शेतामध्ये ३ वेळा सोयाबिनची पेरणी केली होती. परंतु सतत पडणारा पाऊस शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव आणि यलो मोझँकचा अटँक यामुळे सोयाबिनवर वाईट परिणाम होऊन कमी उतार मिळाला.

गेल्या तीन वर्षात 341 शेतकऱ्यांच्या आत्महत्या -एक एकरात केवळ ४ ते ५ कट्टे सोयाबिन झाल्यामुळे लोकांकडून घेतलेले पैसे द्यायचे कसे असा त्यांच्यापुढे प्रश्न होता.त्यांच्या पश्चात विवाहित २ मुले १ विवाहित मुलगी आहे. दोन्ही मुले मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत आहे. त्यांचा एक मुलगा हा पुणे येथे मजुरी करतो. तर दुसरा गावातच मजुरी करून गुजराण करत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन वर्षात 341 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.


सरकार म्हणते दिवाळी जोरात; आनंदाचा शिधा मात्र गायब सर्वसामान्य गरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर पामतेल या चार वस्तू 100 रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने ४ ऑक्टोंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. याला २० दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरीसुद्धा हा शिधा अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी गरिबापर्यंत पोहोचलेला नाही. कारण हा शिधा तसेच यातील काही जिन्नस राशन वितरण दुकानावरच पोहचलेला नसल्याकारणाने याचा बोजवारा उडाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details