महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युपीएससीचे निकाल जाहीर; उस्मानाबादचा निलेश गायकवाड सलग दुसऱ्या वर्षी रँकमध्ये - upsc exam results

भारतीय लोकसेवा आयोग-यूपीएससीच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या परीक्षेत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून 629 रँकने उत्तीर्ण झाले आहेत.

निलेश गायकवाड
निलेश गायकवाड

By

Published : Sep 25, 2021, 7:06 AM IST

Updated : Sep 25, 2021, 8:55 AM IST

उस्मानाबाद - भारतीय लोकसेवा आयोग-यूपीएससीच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या परीक्षेत उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून 629 रँकने उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षीच त्यांनी यूपीएसी परीक्षेत यश संपादित करत देशात 752 क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यावेळी त्यांची संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी नियुक्ती झाली होती. सध्या त्यांची ट्रेनिंग सुरू आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


खासगी नोकरी करताना स्वतःच्या मर्यादा ओळखून यूपीएससीकडे वळले-

निलेश गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण उमरगा येथील श्री केशवराज विद्यालय येथे तर माध्यमिक शिक्षण श्री देशीकेंद्र विद्यालय लातूर येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनीरिंग मध्ये बी. टेक.आणि एम.टेक. पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेड या कंपनीमध्ये इंटर्नशिप केली. बेंगळुरू येथे झिनोव्ह कन्सल्टन्सी कंपनीमध्ये "सहयोगी कंन्सलटन्ट"म्हूणन सेवेत असताना त्यांना आपल्या कार्याच्या मर्यादा लक्षात आल्या. त्यामुळे ते यूपीएससीकडे वळले. नेतृत्व वृत्ती हा त्यांचा गुण असून मुंबई येथील आयआयटी मध्ये शिक्षण घेताना ते जनरल सेक्रेटरी पदी निवडून आले होते.

उस्मानाबादचा निलेश गायकवाड सलग दुसऱ्या वर्षी रँकमध्ये
विद्यार्थीदशेपासून उल्लेखनीय कार्यविद्यार्थी जीवनात त्यांनी विविध स्पर्धा निबंध, कथाकथन, वादविवाद, वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण, प्रश्न मंजुषा, एकपात्री अभिनय, एनसीसी, वैज्ञानिक प्रयोग यामध्ये हिरीहिरीने सहभाग घेतला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय व महाराष्ट्र पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षा,शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ. होमी भाभा वैज्ञानिक परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, स्वयं अध्ययन परीक्षा, सामान्य ज्ञान परीक्षा, गणित या विषयातील पूर्वप्रथमा, प्रथमा, द्वितीया, प्रबोध, सुबोध परीक्षा, इंग्रजी विषयातील एन्टरन्स, प्रायमरी, इंटरमेडियट, अँडव्हान्सड परीक्षा, हिंदी विषयातील नागरी बोध परीक्षा, अखिल भारतीय संस्कृत ज्ञान परीक्षा यामध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने यश मिळणारचं : निलेश गायकवाडअटल बिहारीं वाजपेयी संस्था मनाली येथून त्यांनी बेसिक माऊंटरिंग कोर्से केला आहे. त्यांच्या मते आपली इच्छाशक्ती, आत्मविश्वास, चिकाटी यामधून आपल्यातील उर्मी वाढते. निश्चित संकल्प, योग्य मार्गदर्शन, झोकून देऊन मेहनत करण्याची तयारी, सूक्ष्म नियोजन, त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने यश हमखास मिळू शकते. त्यासाठी योग्य प्रकारची रणनीती आखावी लागते. एकदा का यश मिळाले की आयुष्यभर मानसन्मान, प्रतिष्ठा मिळते. समाजाचे देणे देता येते. समाजासाठी काही करता येते, असेही त्यांनी सांगितले.शासन आणि प्रशासन ही दोन चाके आहेत. या दोन्हीही घटकांनी लोकाभिमुख काम करण्यासाठी प्रयत्न केले, कोणताही प्रश्न टाळण्यापेक्षा संवेदनशील बनवून तो सोडविण्यावर भर दिला, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन लोकाभिमुख कारभार केला. चांगल्या कामावर ठाम राहिले तर शासन आणि प्रशासन या दोन्हीची प्रतिमा चांगली बनू शकते, असे त्यांना वाटते. वडील प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड, आई प्रा.अनिता गायकवाड, भाऊ शैलेश आणि शिक्षकांची प्रेरणा, मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळू शकले, अशी प्रतिक्रिया निलेश गायकवाड यांनी दिली.
Last Updated : Sep 25, 2021, 8:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details