महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक! उस्मानाबाद जिल्हा 'कोरोनामुक्त', 'त्या' तिन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह - corona update

जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या तीनही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. तर, यामुळ तूर्तास उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त
उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त

By

Published : Apr 20, 2020, 9:55 AM IST

उस्मानाबाद -जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आता या तीनही रुग्णाचे अंतिम अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. तर, यामुळे आता उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या तीनही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. हे तिन्ही रुग्ण लोहार आणि उमरगा तालुक्यातील होते. आता या तीनही रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यात २ एप्रिलला उमरगा तालुक्यातील बलसुर येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. त्यानंतर लोहारा तालुक्यात दुसरा आणि उमरगा येथे तिसरा रुग्ण आढळला होता. या तीनही रुग्णांवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा १४ दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली ती निगेटीव्ह आल्याने तूर्तास उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details