उस्मानाबाद - स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी राष्ट्रपतींचे पोलीस पदक दिले जाते. सन-2020 या वर्षातील पदक प्राप्तकर्त्यांची यादी नुकतीच जाहीर झाली. यात उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे दगुभाई मुहंमद शेख यांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख यांना राष्ट्रपती पोलीस पदक - 15 august independence day news
दगुभाई शेख (रा.तिरकवाडी, ता. फलटण) येथील आहेत. ते सन 1983 मध्ये पोलीस खात्यात रुजू झाले असून सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे शहर, नागपूर शहर यांसह महामार्ग सुरक्षा पथक व राज्य गुप्तवार्ता विभागात त्यांनी कर्तव्य बजावले आहे.
दगुभाई शेख (रा.तिरकवाडी, ता. फलटण) येथील आहेत. ते सन- 1983 मध्ये पोलीस खात्यात रुजू झाले असून सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे शहर, नागपूर शहर यांसह महामार्ग सुरक्षा पथक व राज्य गुप्तवार्ता विभागात त्यांनी कर्तव्य बजावले आहे.
सन-2014 पासून ते उस्मानाबाद जिल्ह्यात नेमणुकीस आहेत. पोलीस खात्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना आजपर्यंत 450 हून अधीक बक्षीसे- प्रशस्तीपत्रे मिळाली असुन सन-2014 साली 'पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह' प्राप्त झाले आहे. वेगवेगळ्या गुन्ह्याची उकल करण्यात शेख यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना यंदाचा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाला आहे.या बद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी अभिनंदन केले आहे.