महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कर्फ्यूची योग्य अंमलबजावणी केली नाही, जनतेचा आरोप - collector deepa munde

जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूची योग्य अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्याचबरोबर, ८ दिवसात ३ वेळा जनता कर्फ्यू लागू करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय साध्य केले, असा प्रश्नही नागरिकांडून उपस्थित केल्या जात आहे.

collector deepa munde
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

By

Published : Apr 6, 2020, 8:43 PM IST

उस्मानाबाद- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या फक्त नियोजन शून्य कारभार हाकत असल्याचे मत उस्मानाबादकर व्यक्त करत आहेत. लॉकडाऊन नंतर जिल्ह्याच्या सिमा बंद होऊन बाहेरील लोकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करणे अपेक्षित होते. मात्र, बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे. त्यातच दिल्ली व मुंबई येथील ताज हॉटेलमधून २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यामुळे, जिल्हाधिकारी मुंडे यांनी लॉकडाऊनबाबत हलगर्जीपणा आणि मनमानी कारभार केल्याचे बोलले जात आहे.

माहिती देताना महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य मिलिंद पाटील आणि पत्रकार उपेंद्र कटके

लॉकडाऊन आणि संचारबंदी या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी करण्याचे टाळून जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळेस जनता कर्फ्यू जनतेच्या माथी मारला. संचारबंदी, लॉकडाऊन व जनता कर्फ्यू याचा उद्देश एकच असतो. मात्र, जिल्हाधिकारी मुंडे यांच्याकडून स्वत:चा स्वतंत्र जनता कर्फ्यू जिल्ह्याता लागू केल्या जात आहे. मात्र, या काळात तबलिगीशी संबंधित काही लोक जिल्ह्यात आले. त्यांनी जिल्ह्याची सिमा ओलांडून लातूर जिल्ह्यातही प्रवेश केला. या आठही लोकांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यूची योग्य अमलबजावणी केली नसल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे. त्याचबरोबर, ८ दिवसात ३ वेळा जनता कर्फ्यू लागू करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय साध्य केले, असा प्रश्नही नागरिकांडून उपस्थित केल्या जात आहे.

हेही वाचा-उस्मानाबाद जिल्ह्यात निर्जंतुकीकरणासाठी यूपीएल कंपनी आली मदतीला, अनेक गावांत केली फवारणी

ABOUT THE AUTHOR

...view details