उस्मानाबाद - डिजीटल युगात उपलब्ध अनेक सुविधांमुळे नागरिकांचे शारिरीक व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. याच मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ-मुंडे आज चक्क सायकलने कार्यालयात पोहोचल्या.
हेही वाचा - 2023 मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल..!
जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज सायकलचा वापर करावा, असे परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या नियमाची सुरुवात स्व:त पासून करत दीपा मुधोळ यांनी सायकलस्वारी केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक अधिकारी आणि कर्मचारीही आज सायकलने आले.
हेही वाचा - काँग्रेसचे ऑस्कर पुरस्कार जाहीर : अॅक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नरेंद्र मोदींना
शासकीय अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच सातत्याने बसून काम करीत असल्यामुळे त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. या व्याधी दूर होऊन त्यांनी स्वस्थ आयुष्य जगावे, या उद्देशाने सोमवारी हा उपक्रम राबवण्यात आला.