उस्मानाबाद- महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी टीका केली आहे. शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचार रॅलीत ओमप्रकाश यांनी पाटील यांच्यावर टीका करत भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडा, असे आवाहन केले. त्यामुळे सेना-भाजपतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
..तर शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ; उस्मानाबादेत भाजपाध्यक्षाचा इशारा - राणाजगजितसिंह पाटील
शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचार रॅलीत ओमप्रकाश यांनी पाटील यांच्यावर टीका करत भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडा, असे आवाहन केले. त्यामुळे सेना-भाजपतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा -उस्मानाबादमध्ये सेना-भाजपाच्या मेगा भरती नंतर आता बंडखोरांची मेगा गळती
या संबंधी शनिवारी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन युती धर्म पाळला नाही व भाजपचे उमेदवार पाटील यांना जर पाडण्याची भाषा केली तर त्याला जशास तसे उत्तर देऊ, अशी सूचना वजा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत खासदार ओमराजे यांना दिला. खासदार ओमराजेंनी केलेल्या आवाहनावर समाज माध्यमांमध्ये प्रतिकिया उमटू लागल्याने भाजपने आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मेळावा घेतला जाईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी सतीश दंडनाईक, नितीन भोसले, युवराज नळे, आदी उपस्थित होते.