उस्मानाबाद- देशासह जगावर कोरोनाचे संकट आहे. मात्र अशा गंभीर परिस्थिती काही पोलिसांची खाबुगिरी कमी झाली नसल्याचे चित्र आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस कर्मचाऱ्यंसह एका अनोळखी वाहनचालकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 50 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई केली आहे.
पोलीस उपनिरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - case register against psi and two constable
ट्रॅकटरमधून मुरुमाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणात ३० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत विभागाने कारवाई केली.
ट्रॅकटरमधून मुरुमाची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडले होते. याप्रकरणी तक्रारदार यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी ५० हजार रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती ४५ हजार रुपये मागणी करुन पहिला हफ्ता ३० हजार रुपये स्वीकारत असताना कारवाई केली. मात्र, पीएसआयसह पोलीस कर्मचारी अन शासकीय वाहनचालक पसार झाले.
सापळा अधिकाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, लाचखोर पोलीस पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी तपास अधिकाऱ्यांना दुखापत झाली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सम्राट माने, पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाने, बाळासाहेब बिभीषण हाके व अनोळखी वाहन चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.