उस्मानाबाद- जिल्ह्यात उमरगा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे उमरगा हॉटस्पॉट ठरतोय असे प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र, येथील रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले. त्यानंतर आज तब्बल 50 दिवसानंतर पुन्हा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
मुंबईतून उमरग्याला आलेली महिला पॉझिटिव्ह, उस्मानाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १७ वर - osmanabad corona update
मुंबई येथून 27 वर्षीय महिला 17 मे रोजी खासगी वाहनाने उमरगा येथे आली होती. ती शहरातील एसटी कॉलनी भागात राहत होती. 19 मे रोजी तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. तिचा अहवाल गुरुवारी 21 मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे.
या नवीन रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे. यापैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुंबई येथून 27 वर्षीय महिला 17 मे रोजी खासगी वाहनाने उमरगा येथे आली होती. ती शहरातील एसटी कॉलनी भागात राहत होती. 19 मे ला तिचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. तिचा अहवाल गुरुवारी(21 मे) पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेवर सध्या उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सलग लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या फार कमी होती. मात्र, मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यात अडकलेले नागरिक स्वगावी परतत आहे. त्यामुळे कोरोना नसलेल्या भागातदेखील रुग्ण आढळत आहेत.