उस्मानाबाद- लोकसभा निवडणुकीच्या काळात महसुल आधिकारी व्यस्त असल्याने, ही साधून धुमाकुळ घातलेल्या वाळू चोरावर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी रविवारी मध्यरात्री परंडा तालूक्यातील लोहारा येथील नदी पात्रातुन वाळू चोरी करताना एका ट्रॅक्टरला पकडले. त्यामुळे वाळू चोरात खळबळ उडाली आहे.
वाळू तस्करांवर तहसीलदारांची मध्यरात्री कारवाई; ट्रॅक्टर जप्त - district
ट्रॅक्टर तहसीलदार यांनी पाठलाग करून पकडला.
मागील महिन्यात लोकसभा निवडणूक असल्याने तहसीलदारांसह कर्मचारी निवडणूकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे वाळू चोर मोकाट झाले होते. तसेच वाळू चोरांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे वाळू चोरांना लगाम घालण्यासाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले.
नायब तहसिलदार मिलींद गायकवाड, मंडळ आधिकारी ए .आर .आटोळे, म.आधिकारी एस .एस खुळे, तलाठी सी .एम चुकेवाड , अव्वल कारकुन एन.बी. करळे, कोतवाल संजय पवार यांनी पोलीस बंदोबस्तशिवाय मध्यरात्रीच्या सुमारास लोहारा येथील सीना नदी पात्रात जाऊन पाहणी केली. तेव्हा नितीन चव्हाण यांचा ट्रॅक्टर चोरीची वाळू वाहतुक करताना आढळून आला. हा ट्रॅक्टर तहसीलदार यांनी पाठलाग करून पकडला.