उस्मानाबाद- उमरगा पोलीस स्टेशनमधील ४ पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यातच ४ पोलिसांमध्ये झाली तुंबळ हाणामारी, एक गंभीर - INJURED
४ पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस स्टेशनमध्येच तुबंळ हाणामारी ...हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एकावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू.... अवैध व्यवहाराच्या कारणावरून उमरगा पोलीस स्टेशनमध्ये घडली घटना
उस्मानाबाद
अवैध व्यवहाराच्या कारणावरून भांडण झाल्याची चर्चा उमरगा पोलीस ठाण्याच्या परिसरात सुरू होती. गायकवाड, बेले शिंदे आणि राजू राठोड अशी हाणामारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या हाणामारीत राजू राठोड हा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्यांच्यावर सिव्हील रुग्णालायत उपचार सुरू आहेत.