उस्मानाबाद - बुकनवाडी या गावातील सुरेश काळे या 20 वर्षांच्या तरुणाचा लघुशंका केल्यामुळे खून करण्यात आला. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातीलच एका महिलेच्या समोर लघुशंका केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडलाय. या प्रकरणी रुक्मिणी अरुण काळे यांनी तक्रार दिली आहे. सुरेश या तरुणाने एका महिलेसमोर लघुशंका केली. यानंतर त्याला गावातीलच गायरान शेतात लाथा बुक्यांनी मारहाण केली आणि गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. तसेच सुरेशचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. घटनेनंतर 24 तास उलटल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
लघुशंका केली म्हणून तरुणाचा खून; सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल - उस्मानाबाद गुन्हे वृत्त
बुकनवाडी या गावातील सुरेश काळे या वीस वर्षांच्या तरुणाचा लघुशंका केल्यामुळे खून करण्यात आला. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लघुशंका केली म्हणून तरुणाचा खून; सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल
त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तणाव वाढत गेला होता.आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास तरुणांच्या नातेवाईकांनी नकार दिल्याने गुरुवारी रात्री उशिरा बालाजी वाकुरे, पांडुरंग वाकुरे, पोपट वाकुरे, योगेश वाकुरे, समाधान वाकुरे, अंकुश बुकन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. संबंधित गुन्ह्याचा तपास कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील करत आहेत.