महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये आढळले 130 कोरोना रुग्ण; आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू - corona updates in osmanabad

उस्मानाबादमध्ये बुधवारी 130 कोरोनाबाधित रुग्ण वाढले. जिल्ह्यात 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 859 वर पोहोचली आहे. 482 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Osmanabad corona update
उस्मानाबाद कोरोना अपडेट

By

Published : Jul 30, 2020, 12:07 PM IST

उस्मानाबाद -जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसें दिवस वाढत चालली आहे. रुग्णसंख्येसोबत मृत्यू दरही दिवसागणिक वाढत आहे. बुधवारी 130 नवे रुग्ण आढळले आहेत. उस्मानाबादमध्ये 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे.

एकाच दिवशी 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. प्रथमच येवढे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. साधारणपणे दहा ते वीस रुग्ण आढळून येत होते. मात्र, रुग्णांची वाढलेली संख्या चिंता वाढवणारी आहे

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 859 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. 482 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर अद्यापही 329 रुग्ण उपचार घेत आहेत. 48 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान जीव गमावला आहे.

सुरुवातीच्या काळात उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता. मात्र, जस जशी अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तसतसे कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, राज्यात बुधवारी 9 हजार 211कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एकूण रुग्णसंख्या 4 लाख 651 एवढी झाली आहे. दिवसभरात राज्यात 7 हजार 478 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2 लाख 39 हजार 755 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 146129 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details