महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू , ग्रामस्थ संतप्त - महावितरणवर मनुष्यवधाचा गुन्हा

उस्मानाबादमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी महावितरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.

संतप्त ग्रामस्थांनी गोंधळ घातला

By

Published : Sep 25, 2019, 11:39 PM IST

उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील डिकसळ येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला. गणेश मधुकर जाधव (वय-२८) हे घरावर कपडे वाळत टाकण्यासाठी चढले असता ही घटना घडली.

स्मानाबादमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला


गणेश जाधव यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. महावितरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिला.

हेही वाचा - सोलापुरात परतीच्या पावसाची जोरदार बॅटींग

विजेच्या तारा खाली लोंबकळत असल्याने यापूर्वीही एकदा अशी घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी खालिद शिकलकर (वय-२९) यांचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. शिकलकर यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी विजेच्या तारा व्यवस्थित करण्यासाठी वारंवार निवेदन दिली गेली. रास्तारोको देखील करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने फक्त आश्वासन देण्याखेरीज काहीही केले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details