उस्मानाबाद - विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. अशातच, उस्मानाबाद कळम विधानसभा मतदारसंघातील ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी मला उमेदवारी काढून घेण्यासाठी बारा लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा अपक्ष उमेदवार दत्ता तुपे यांनी केला आहे.
ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी दिली होती 12 लाखांची ऑफर - अपक्ष उमेदवार दत्ता तुपे
ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मला उमेदवारी काढून घेण्यासाठी बारा लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा अपक्ष उमेदवार दत्ता तुपे यांनी केला आहे. राष्ट्रवादीकडूनही आपल्याला तीन लाखांची ऑफर होती मात्र आपण उमेदवारी मागे घेतली नाही असे तुपे सांगतात. तूपे यांचा हा व्हीडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा - ओमराजेंनी लोकांचे संसार बुडवल्याचा राग म्हणून केला हल्ला; आरोपीचा व्हिडिओ व्हायरल
सर्वच उमेदवार अगदी कंबर कसून कामाला लागले आहेत. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारही प्रचाराच्या बाबतीत मागे राहिलेले नाहीत. तुपे हे गावोगावी जाऊन 'मला निवडून द्या' अशी मागणी करत आहेत. त्याबरोबरच, निवडणुका म्हटल्या की पैशांचा खेळ येतोच असेही ते म्हणतात. राष्ट्रवादीकडूनही आपल्याला तीन लाखांची ऑफर होती मात्र आपण उमेदवारी मागे घेतली नाही असे तुपे यांनी म्हटले आहे. तुपे यांचा हा व्हीडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.