महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; रुग्णांची संख्या 73 वर - Osmanabad Corona Update News

कोरोनाने जिल्ह्यात आपली पकड मजबूत केली असून आज घडीला 73 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची नोंद आहे. तर जिल्ह्यातील 73 रुग्णांपैकी 19 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

उस्मानाबाद
उस्मानाबाद

By

Published : Jun 1, 2020, 4:28 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाने तिसरा बळी घेतला आहे. कोरोनाने जिल्ह्यात आपली पकड मजबूत केली असून आज घडीला 73 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची नोंद आहे.

उस्मानाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; रुग्णांची संख्या 73 वर

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील 64 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. आज सकाळी तीचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. या पूर्वी जिल्ह्यात दोन लोकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र, हे तिन्ही रुग्ण कोरोना विषाणू सोबतच इतर आजाराने देखील ग्रासलेले होते. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते.

जिल्ह्यातील 73 रुग्णांपैकी 19 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना 14 दिवस होम कॉरंटाइंन करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे यांनी सांगितले. तर इतर कोरोनाबाधित रुग्णांवरती अद्याप उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details