उस्मानाबाद- दिल्ली मधील हजरत निजामुद्दीन येथील तबलिग-ए-मर्कझमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये उस्मानाबाद मधील 8 लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. मात्र एका व्यक्तीचे दोन वेळेस नाव आले असून दिल्लीच्या कार्यक्रमाचे कनेक्शन असलेले उस्मानाबादचे फक्त 7 लोकं असल्याचे समोर आले आहे.
उस्मानाबादचे निजामुद्दीन कनेक्शन; एक मृत,दोघे होम क्वारंटाईन, चौघे अजूनही दिल्लीत - निजामुद्दीन येथील तबलिग-ए-मर्कझमध्ये सहभागी
निजामुद्दीन येथील तबलिग-ए-मर्कझमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये उस्मानाबादमधील ७ लोकांचा सहभाग होता. यातील चार लोक उस्मानाबादला आले नसून ते दिल्लीतच असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. उरलेल्या तीन लोकांना शोधले आहे, मात्र या तीन व्यक्ती पैकी एक व्यक्ती मृत झाला आहे.
यातील चार लोक उस्मानाबादला आले नसून ते दिल्लीतच असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. उरलेल्या तीन लोकांना शोधले आहे, मात्र या तीन व्यक्ती पैकी एक व्यक्ती मृत झाला आहे. दुसऱ्या दोघांचे सिम्प्टम्स घेऊन तपासणी करण्यात आली. या दोघांमध्ये अशी लक्षणे आढळून आले नाहीत. तरी खबरदारी म्हणून या दोघांना यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
7 लोकांची यादी आमच्याकडे आली असली. तरी प्रत्यक्षपणे या लोकांचा सहभाग दिल्लीच्या त्या कार्यक्रमांमध्ये नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.