उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे अज्ञात महिलेने नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भकास काटेरी झुडुपांनी वेढलेल्या विहिरीत फेकून दिले आहे. हंगरगा रस्त्यालगत असलेल्या एका पडीक पडलेल्या शेत जमिनीत हे पुरुष जातीच्या अर्भकास फेकून अज्ञात महिलेने पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
धक्कादायक..! अज्ञाताने पुरुष जातीचे अर्भक फेकले विहिरीत; कुत्र्यांनी तोडले लचके - osmanabad news
अज्ञात महिलेने नवजात पुरुष अर्भक काटेरी झुडुपांनी वेढलेल्या विहिरीत फेकून दिले होते. त्या अर्भकाचे लचके श्वान मोडत होते. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे घडली.
या मृतावस्थेत पडलेल्या पुरुष जातीच्या अर्भकाचे श्वान लचके तोडत होते. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर या घटनेची माहिती तुळजापूर पोलीस ठाणे व आरोग्य विभागाला देण्यात आली. यावेळी मृतावस्थेत पडलेल्या पुरूष जातीच्या अर्भकास पाहण्यासाठी गावातील महिलांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या प्रकरणी पोलीस पाटील परमेश्वर खताळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात महिले विरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -'माझी आई देवा घरी गेली हो, घरातला किराणाही संपला, आम्हालाही मदत करा'