महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादेत रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादीचे गॅस दरवाढविरोधात आंदोलन - गॅसदरवाढ

केंद्र शासनाने गॅसच्या दरात प्रचंड वाढ करत नागरीकांच्या अडचणीत भर टाकली, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी

By

Published : Dec 29, 2020, 8:21 PM IST

उस्मानाबाद - केंद्र शासनाने गॅसच्या दरात प्रचंड वाढ करत नागरीकांच्या अडचणीत भर टाकली, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. चालू डिसेंबर महिन्यात दोनवेळा प्रत्येकी पन्नास रुपये प्रमाणे शंभर रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर चूल मांडून भाकरी बनवून आंदोलन करण्यात आले. तसेच बनवलेल्या भाकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाने पाठविण्यात आल्या.

यावेळी नववधुच्या हस्ते या भाकरी बनविण्यात आल्या. यावेळी उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष मनिषा राखुंडे-पाटील, राणी रोहिदास, संगीता फाटक, मंजुषा खळदकर, अंजली जाधव आदींची उपस्थिती होती.

तुम्हाला आमचे अश्रू दिसत नाहीत का-

राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळेच्या एमआयडीसी येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना डोळ्यांना धुर लागून डोळे खराब होतात, असे म्हटले होते. मग आता तुम्हाला आमचे अश्रू दिसत नाहीत का? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.

तसेच वाढलेली गॅसदरवाढ त्वरीत मागे घ्यावी. अन्यथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन आणखी आक्रमक केले जाइल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे सुशिल शेळके, कुणाल निंबाळकर, रूषीकेश जाधव, रोहण गव्हाणे, कृष्णा पाटील, सईद काझी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणूक : ऑनलाईन-ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास मुदतवाढ

ABOUT THE AUTHOR

...view details