उस्मानाबाद -भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला.
उस्मानाबादमध्ये गोपीचंद पडळकरांचा निषेध; राष्ट्रवादी आक्रमक - गोपीचंद पडळकरांचा निषेध
आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला.
गोपीचंद पडळकरांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शंतनू खंदारे, पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, प्रवक्ता सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार वाघमारे, भीमा हगारे, अतुल धुमाळ, किरण मस्के, शाहजहान शिगलकर आदी उपस्थित होते. दरम्यान महाराष्ट्रातील तसेच विविध शहरातून पडळकरांचा निषेध नोंदवण्यात येत आहे.
बुधवारी गोपीचंद पडळकर यांनी 'शरद पवार म्हणजे, महाराष्ट्राला लागलेला कोरोना' असल्याचे वक्तव्य केले. यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. विविध नेत्यांनी त्याचा निषेध व्यक्त केला. भाजपाने देखील हात झटकल्यानंतर पडळकरांना सर्वत्र निषेधाला सामोरे जावे लागले. आज राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीने पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.