उस्मानाबाद - आत्तापर्यंत जिथे कुठे स्थानिक पातळीवर भाजपा-सेनेसोबत घरोबा केला असेल त्याचा काडीमोड घेतला जाईल. यापुढे काँग्रेस व राष्ट्रवादी कुठल्याही निवडणूकीत एका ताकदीने काम करेल, असे राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबादची लोकसभा ही भाऊबंदकीमुळे चर्चेत आहे. पापारंपरिक विरोधक असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ-सरळ लढत होईल.
काल ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या टीकेला आज राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, गेल्या ५ वर्षात काहीच विकास झालेला नाही. सगळा विकास आम्हीच केला आहे. आम्हाला वैयक्तिक कोणाबद्दल बोलायचे नाही. त्यात रसही नाही. वेळ आल्यास बघून घेऊ, प्रत्युत्तरही दिले जाईल.
उमेदवारी अर्ज भरताना डॉ.पद्मसिंह पाटील, काँग्रेसचे सिद्रामप्पा आलुरे, दिलीप देशमुख, बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, शरण पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.