उस्मानाबाद -राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज (बुधवार) बेरोजगारीच्या मुद्याला घेऊन 'जवाब दो जॉब दो' आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस वर चहा व भजी तयार करून नागरिकांना वाटत सरकारचा निषेध करण्यात आला.
पकोडे तळून राष्ट्रवादीने केले 'जवाब दो' आंदोलन - आंदोलन
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज (बुधवार) बेरोजगारीच्या मुद्याला घेऊन 'जवाब दो जॉब दो' आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात एकही मोठा उद्योग उभारला नाही. येथील तरुण कामाच्या शोधात जिल्हा बाहेर जाऊ लागला आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादीने हे आंदोलन केले. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी बेरोजगारी कमी करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार व फडणवीस सरकारचा धिक्कार असोच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. शहरातील राष्ट्रवादी भवनासमोरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते घोषणाबाजी देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले. येथेच भजी व चहा बनवून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना एसटी बस व इतर वाहने थांबून भजी वाटण्यात आली. दरम्यान आंदोलन झाल्यानंतर जिल्हाधिकाऱयांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या आंदोलनात राजसिंह राजेनिंबाळकर, युवराज नळे, यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.