उस्मानाबाद- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाच्या प्रादुर्भावातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुळजाभवानीची महाआरती करत साकडे घालण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चालला असला तरी सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून राजकीय नेत्यांकडून आवाहन करण्यात येत होते. काळजी घेण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र, तरीही कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली.