महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये भवानी ज्योत घेऊन जाण्याची परंपरा, तुळजापूरमधून नेली जाते ज्योत - नवरात्र उत्सव बातमी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा जयघोष करत नवरात्र उत्सवात भवानी ज्योत घेऊन जाण्याची वेगळी परंपरा आहे. ही ज्योत देवीच्या मूर्तीसमोर प्रतिष्ठापित करण्याची परंपरा आहे.

नवरात्र उत्सवात भवानी ज्योत घेऊन जाण्याची परंपरा

By

Published : Oct 1, 2019, 9:40 AM IST

उस्मानाबाद -महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा जयघोष करत एक अनोखी परंपरा जपली जाते. 'आई राजा उदे उदे'च्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला, या नवरात्रात भवानी ज्योत घेऊन जाण्याची वेगळी परंपरा जपली जाते. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील भाविक तुळजाभवानीच्या मंदिरात मशाल प्रज्वलित करून आपापल्या गावी घेऊन जातात, नवरात्र उत्सवाच्या काळात ग्रामीण भागासह शहरी भागात गणरायाच्या मूर्तीप्रमाणेच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे.

नवरात्र उत्सवात भवानी ज्योत घेऊन जाण्याची परंपरा

या गावात मंडळातर्फे स्थापना करण्यात आलेल्या देवीच्या मूर्तीसमोर ही भवानी ज्योत तेवत ठेवली जाते. तुळजाभवानीच्या मंदिरासमोर होमकुंड आहे. या होम कुंडापासून भवानी ज्योत प्रज्वलीत केली जाते. त्यानंतर ही भवानी ज्योत गावाकडे नेली जाते. यावेळी अनवाणी पायांनी भवानीज्योत घेऊन तरुण, लहान आणि वृद्ध भक्त रस्त्याने धावत असतात. साधारण एक एक किलोमीटरच्या अंतरावर दुसरा देवीचा भक्त थांबलेला असतो त्याला ही भवानीज्योत दिली जाते. त्यानंतर हा पहिला भक्त वाहनाच्या साहाय्याने काही अंतर पुढे जाऊन थांबतो, यावेळी मागून भवानी ज्योत घेऊन येणारा भक्त थकल्यानंतर ही ज्योत पहिल्या भक्तांकडे सोपवली जाते.

साधारण 20 ते 25 भक्त टप्प्याटप्प्याने ज्योत घेऊन गावाकडे जातात. मंदिरात वाजत-गाजत भवानी ज्योत पेटवली जाते, गावात आल्यानंतर या भक्तांचे वाजतगाजत स्वागत केले जाते. त्यानंतर सोबत आणलेली भवानी ज्योत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या देवीसमोर ठेवली जाते. अशा पद्धतीने ग्रामीण भागासह शहरी भागात भवानी ज्योत तेवत ठेवण्याची परंपरा जपली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details