महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नैसर्गिक आपत्ती म्हणजे राज्यकर्त्यांना पैसे खाण्याची संधी - जलतज्ज्ञ एच.एम देसरडा - नगर विकास खाते देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा उद्योग भाजप सरकार करत आहे. त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्ती ही जनतेचा पैसा खाण्याची संधी वाटते, असा घणाघाती आरोप जलतज्ज्ञ एच. एम देसरडा यांनी केला आहे.

नैसर्गिक आपत्ती म्हणजे राज्यकर्त्यांना पैसे खाण्याची संधी - जलतज्ज्ञ एच एम देसरडा

By

Published : Aug 19, 2019, 9:29 PM IST

उस्मानाबाद -नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा उद्योग भाजप सरकार करत आहे. त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्ती ही जनतेचा पैसा खाण्याची संधी वाटते, असा घणाघाती आरोप जलतज्ज्ञ एच. एम देसरडा यांनी केला आहे.

देसरडा पुढे म्हणाले, नगर विकास खात्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे राज्याची वाट लावत आहेत. भाजप सरकार काँग्रेसपेक्षा अधिक पटीने भ्रष्टाचार करत आहे. मृतदेहाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे काम राज्यकर्ते करत आहेत. हा महाराष्ट्र फुले, शाहू, शिवाजी महाराज, आंबेडकरांचा राहिला नसून पेंढारांचा महाराष्ट्र झाला आहे.

हजारो वर्षांचा नद्यांचा प्रवाह बदलणे, टेकड्या नष्ट करणे, नद्यांतील वाळू काढणे म्हणजे नद्यांचे फुफ्फुस काढून घेण्यासारखे असल्याचेही देसरडा म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details