उस्मानाबाद- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (शुक्रवारी) मुस्लिम समुदायाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. झारखंड येथील झुंडशाहीला बळी पडलेल्या तरबेज अन्सारी या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मुस्लिम समुदायाकडून निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समुदायाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - religious crime
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल (शुक्रवारी) मुस्लिम समुदायाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. झारखंड येथील झुंडशाहीला बळी पडलेल्या तरबेज अन्सारी या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते.
देशात मुस्लिम समाज व दलित समाजावर वाढलेला अत्याचार थांबविणे. जातीवादी घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करने. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे. जातीयवादी संघटना अशा घटनेला कारणीभूत असून कायद्याचा त्यांना धाक राहिला नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर सरकारकडून अशा घटनेविरोधात ठोस पावले उचलली जात नाहीत. ही बाब गंभीर असून यावर तत्काळ उपाययोजना करावी आणि तरबेज अन्सारीला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'इंसाफ दो, इसाफ दो, अन्सारी को इंसाफ दो' अशा घोषणाही देण्यात आल्या. या आंदोलनात शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता.