उस्मानाबाद -शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. यामध्ये देवीच्या हातात श्रीकृष्णाची मुरली दिली आहे.
ही मुरली श्रीकृष्णाने तुळजाभवानीला दिली असल्याची अख्यायिका सांगितली जाते. मुरली अलंकार महापूजेत देवीला सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. तुळजाभवानी देवीचे हे सजलेले रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली.