उस्मानाबाद - एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन आता चांगलेच चिघळताना पाहायला मिळत आहे. नुकतेच एका कर्मचाऱ्याने आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने एसटीला दोर बांधून आत्महत्या केली होती. ही बातमी ताजी असतानाचं उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील एस. टी आगारासमोरील झाडावर कर्मचारी सच्चीनंद अशोक पुरी पहाटेपासून झाडावर गळ्यात फास अडकवून चढुन बसला होता. यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली होती.
फेसबुक लाईव्ह करून आपण आत्महत्या करत असल्याची दिली माहिती
कळंब आगारासमोर नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांनी एकच टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच शहरातील पोलीस कर्मचारी, आरोग्य, महसूल आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले होते. कळंब पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, तहसीलदार शिंदे, नायबतहसीलदार भुर्के यांनी संतप्त कर्मचाऱ्याला खाली उतरण्याची विनंती केली. मात्र 4 ते 5 तास विनवण्या करून देखील संबंधित कर्मचारी खाली उतरला नाही.
कळंबमध्ये गळ्यात दोर बांधून कर्मचारी चढला झाडावर फेसबुक लाईव्ह करून दिली आत्महत्या करत असल्याची माहिती -जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचा पत्र स्वतः जिल्हाधिकारी घेऊन येत नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका कर्मचारी पुरी यांनी घेतली होती. या दरम्यान घटनास्थळी मोठ्याप्रमाणात गर्दी जमा झाली होती. पहाटे पाच वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ही घडामोड घडली. पहाटे 5 वाजता कर्मचारी पुरी यांनी फेसबुक लाईव्ह करून आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. यात त्यांनी काही एसटी महामंडळातील संघटनानी आंदोलन बंद पडल्याचा आरोप देखील केला होता.
भाजप आमदार राणा जगजितसिंह यांनी फोनवर साधले संपर्क -जर मी आत्महत्या करू नये, असं वाटत असेल तर सर्वांनी कळंब आगाराच्या गेटवर यावं आणि एकही बस बाहेर निघू देऊ नये, असं फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं. लाईव्हच्या माध्यमाने कळल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आगाराच्या गेटवर गर्दी करत खाली उतरण्याची विनंती केली. या दरम्यान भाजपा नेते आणि तुळजापूर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आंदोलक कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि खाली उतरण्याची विनंती केली.
सर्व संघटना एकत्र या; लेखी द्या, अन्यथा मी खाली उतरणार नाही तर भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आगरातून एकही बस बाहेर निघू देणार नाही, मात्र तुम्ही खाली उतरा, असे आश्वासन दिले. एसटी महामंडळाचे विविध विभागातील सर्व कर्मचारी संघटना एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होण्या संदर्भात सहमती दर्शवत नाही आणि प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, असा पवित्रा पुरी यांनी घेतला होता.
नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागेअखेर नायब तहसीलदार भुर्के यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर संबंधित संतप्त कर्मचारी खाली उतरला. मात्र, या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला. तर पुरी यांनी खाली उतरून तहसीलदार शिंदे यांच्यासमोर महामंडळातील तक्रारीचा पाढा वाचला. शासनापर्यंत आम्ही तुमच्या मागण्या पोहचवू असे आश्वासन तहसीलदार शिंदे यांनी पुरी यांना दिले. काही तास का होईना या घटनेमुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती.