उस्मानाबाद - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी पार केली असून, आतापर्यंत एकूण 104 रुग्णांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झाली आहे. 55 रुग्णांवर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड 19 अंतर्गत उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद उस्मानाबाद तालुक्यात झाली असून, सर्वात कमी नोंद हे भूम तालुक्यात झाली आहे. काल (गुरुवारी) रात्री आलेल्या अहवालात उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सांजा रोड परिसरातील सात लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कळंब तालुक्यातील नव्याने दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्याच बरोबर भूममध्ये एक असे एकूण दहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडेल, त्यामुळे जिल्ह्यात 104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
उस्मानाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरी पार
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी पार केली असून, आता पर्यंत एकूण 104 रुग्णांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झाली आहे. 55 रुग्णांवर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड 19 अंतर्गत उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद उस्मानाबाद तालुक्यात झाली असून, सर्वात कमी नोंद हे भूम तालुक्यात झाली आहे.
उस्मानाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शंभरी पार
तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद 104 वर -
उस्मानाबाद - 39
तुळजापूर - 04
उमरगा - 16
लोहार - 06
कळंब - 21
वाशी - 04
भूम - 03
परंडा - 11