उस्मानाबाद - राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसने थैमान घालायला सुरुवात केलं आहे. त्यातही रुग्णांची संख्या पुणे येथे जास्त आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील रोजंदारीसाठी गेलेले लोक हे आपल्यालाही हा आजार होईल या भीतीने आपापल्या गावाकडे निघाले आहेत. हातातलं काम निसटल्याने पुण्या-मुंबईतील लोंढेच्या लोंढे आपल्या गावी परतायला निघाले आहेत. असेच पुण्यातील विविध भागात राहणारे तब्बल 119 महीला व पुरुषांसह लहान मुलांचा समावेश असलेला ट्रक पोलिसांनी कळंब येथे ताब्यात घेतला आहे.
पुण्याहून आपल्या गावी निघालेल्या 119 लोकांचा ट्रक पोलिसांनी पकडला - corona news
राज्यात आणि देशात कोरोना व्हायरसने थैमान घालायला सुरुवात केलं आहे. त्यातही रुग्णांची संख्या पुणे येथे जास्त आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील रोजंदारीसाठी गेलेले लोक हे आपल्यालाही हा आजार होईल या भीतीने आपापल्या गावाकडे निघाले आहेत. असेच पुण्यातील विविध भागात राहणारे तब्बल 119 महिला व पुरुषांसह लहान मुलांचा समावेश असलेला ट्रक पोलिसांनी कळंब येथे ताब्यात घेतला आहे.
पुण्याहून आपल्या गावी निघालेल्या 119 लोकांचा ट्रक पोलिसांनी पकडला
या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. हे सर्व कळंबमार्गे अहमदपुरला जात होते. यावेळी कळंब बस स्थानकासमोर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. आमच्या हाताचे काम सुटल्याने व तिथे राहून तरी काय करायचं असा प्रश्न निर्माण झाल्याने आम्ही सर्व आता आमच्या गावी निघालो असल्याचे या लोकांनी सांगितले.