उस्मानाबाद- शासनाचे मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाचे एकाच दिवशी एकाच वेळी सामूहिक वाचन हा उपक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आला होता. या उपक्रमात सर्व शाळांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
लोकराज्यचे सामूहिक वाचन जिल्ह्यातील वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - नगर परिषद शाळा
उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 1 लाख 41 हजार 206 वाचकांनी एकाच वेळी शासनाचे मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य' मासिकाचे सामूहिक वाचन केले.
वाचन करताना विद्यार्थी
जिल्ह्यातील 751 जिल्हा परिषद शाळा, 9 नगर परिषद शाळा, 201 खासगी शाळा, 74 शासकीय अनुदानित शाळा, अशा विविध शिक्षण संस्थांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण 1 लाख 41 हजार 206 वाचकांनी 'लोकराज्य सामूहिक वाचन' या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
हेही वाचा - उमरग्यात शाॅर्ट-सर्किटमुळे पाच एकर ऊस जळाला, लाखोंचे नुकसान