उस्मानाबाद - तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीची कुरापत काढून आलूर येथे पीडितेच्या पतीला लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण करण्यात आली आहे. पीडितेच्या पतीने तीन महिन्यापूर्वी विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून त्यांना गावातील काही लोकांनी हनुमान मंदिराजवळ शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
धक्कादायक; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी जमावाची पीडितेच्या पतीला मारहाण - उस्मानाबादेत जमावाची तरुणाला मारहाण
पीडितेच्या पतीने तीन महिन्यापूर्वी विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून त्यांना गावातील काही लोकांनी हनुमान मंदिराजवळ शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.
![धक्कादायक; विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी जमावाची पीडितेच्या पतीला मारहाण crime](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-04:54:52:1598268292-mh-osm-01-crime-7204246-24082020135348-2408f-1598257428-695.jpg)
मुरुम पोलीस ठाणे
यात पीडितेचा पती जखमी झाला असून त्यांना उमरगा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उजव्या हाताची बोटे मोडली आहेत.
या प्रकरणी पीडितेच्या पतीने मुरूम पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या लोकांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन सागर पाटील,निखिल पाटील,अविनाश बोळदे,श्रीकांत बोळदे,प्रशांत जेवरे, सुधाकर कुंभार, शंकर कुंभार, सोमय्या स्वामी, सुमंत महाराज, शारदा कुंभार या दहा जणांविरूद्ध कलम 326, 147, 148, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.