उस्मानाबाद- शिवसेनेत लक्ष्मीपुत्र अशी ओळख असलेले आमदार तानाजी सावंत अद्यापही शिवसेनेवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या निवडणुकीतही तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपला मदत केली होती. आज जिल्हा नियोजन बैठकीतही आमदार तानाजी सावंत हे गैरहजर होते.
सावंत यांची नाराजी पुन्हा समोर हेही वाचा - अ. भा. म. सा. संमेलनानंतर उस्मानाबदमध्ये भरवलं जाणार राजकीय साहित्य संमेलन!
यामुळे अध्यक्षपदी भाजपचा सदस्य विराजमान झाले. तर उपाध्यक्ष म्हणून पुतणे धनंजय सावंत यांना संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांवर भाजपाच्या गटाला मदत करत सावंत यांनी शिवसेनेला जोरदार झटका दिला. तर आज झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत आमदार तानाजी सावंत हे उपस्थित नसल्याने तानाजी सावंत यांची नाराजी कायम असल्याची चर्चा सुरू होती.
हेही वाचा - उस्मानाबाद: जिल्हा परिषदेतील विषय समित्यांवर 'भाजपचा'च कब्जा
मंत्रिपदाची संधी हुकल्याने आमदार तानाजी सावंत हे नाराज झाले असल्याचे बोलले जाते आहे. आज उस्मानाबादचे पालकमंत्री शंकर गडाख यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तानाजी सावंत यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सर्व आमदारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे सावंत यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नसल्याने सावंतांनी नाराजी पुन्हा समोर आलेली आहे.