महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमधील धनगर आरक्षणाच्या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकरांना डावलले - उस्मानाबाद धनगर आरक्षण गोपीचंद पडळकर बातमी

सुरेश कांबळे आणि इतर कार्यकर्त्यांनी आंदोलनाची धुरा संभाळत मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. मोर्चा काढून निवेदन दिल्यानंतर मात्र आमदार पडळकर हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले. मात्र, पडळकरांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरुनच त्यांना परत फिरावे लागले.

mla gopichand padalkar was defeated in the dhangar reservation march in osmanabad
उस्मानाबादमधील धनगर आरक्षणाच्या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकरांना डावलले

By

Published : Oct 6, 2020, 5:34 PM IST

Updated : Oct 6, 2020, 6:58 PM IST

उस्मानाबाद -धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज जिल्ह्यात रास्ता रोको करत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांना डावलण्यात आल्याचा प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

उस्मानाबादमधील धनगर आरक्षणाच्या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकरांना डावलले

धनगर आरक्षण कृती समितीने या आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनासाठी जिल्ह्यतील सुरेश कांबळे, भाजपचे गणेश हाके यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना आमंत्रित करण्यात आले. साधारण पणे दुपारी 12 वाजता या आंदोलनात सहभागी होण्याची वेळ या सर्वांना देण्यात आली होती. मात्र आमदार गोपीचंद पडळकर आणि गणेश हाके यांनी आंदोलन दरम्यान वेळेत हजेरी लावली नाही. त्यामुळे सुरेश कांबळे आणि इतर कार्यकर्त्यांनी आंदोलनाची धुरा संभाळत मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. मोर्चा काढून निवेदन दिल्यानंतर मात्र आमदार पडळकर हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले. मात्र, पडळकरांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरुनच त्यांना वापस फिरावे लागले. पडळकर यांना उशीर झाल्याने या आंदोलनात दोन गट पडल्याचे देखील पाहायला मिळाले. त्याच बरोबर या दोन गटात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.

Last Updated : Oct 6, 2020, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details