उस्मानाबाद - शहरातील एका नामांकित शाळेतील शिक्षक मोहन संपतराव सुरवसे (वय ५०) याने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संतप्त जमावाने शाळेत जावून त्या शिक्षकास बेदम चोप दिला आणि शहर पोलीस ठाण्यात नेवून तक्रार दाखल केली आहे.
सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीशी गेल्या काही दिवसांपासून अश्लील चाळे करून गैरवर्तन करत होता. मुलगी घरी रडत आल्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने संबंधित शिक्षक गेल्या काही दिवसांपासून मांडीवर घेऊन बसवणे, नको त्या ठिकाणी हात लावणे, अश्लील चाळे करून गैरवर्तन करणे, असे प्रकार करत असल्याचे समजले. त्यानंतर मुलीचे पालक आणि काही लोक जाब विचारण्यासाठी शाळेत गेले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पालकांनी त्यास शाळेतच चोप देवून पोलीस ठाण्यामध्ये मारत नेले. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.