उस्मानाबाद- कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मोठ मोठे उद्योग धंदे बंद झाले आहेत. ग्रामीण भागातील उद्योगांना देखील कोरोनाचा फटक बसला आहे. जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो, मात्र कोरोनामुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे.
उस्मानाबादेत झाडांना दुग्धाभिषेक, यामुळे आली शेतकऱ्यांवर 'ही' वेळ - osmanabad milk production
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्मया लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीसोबत जोडधंदा म्हणून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय बंद पडला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. शेतीसोबत जोडधंदा म्हणून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय बंद पडला आहे. दूध विक्री बंद झाल्यामुळे त्यापासून निर्मित पदार्थांचे व्यवसायही ठप्प झाले. नाईलाजाने शेतकऱ्यांना कित्येक लिटर दूध फेकून द्यावे लागत आहे. एका शेतकऱ्याने दूध फेकून देण्याऐवजी शेतातील झाडांना दूध घातले, जणू वृक्षराजीला त्यांनी दुग्धाभिषेक घातला आहे.
हेही वाचा-कानेगावचा जावई दानशूर... मात्र, सासरवाडीच निघाली फुकट खाऊ