महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमधील नेट कॅफेमध्ये अज्ञातांकडून एकाची हत्या - उस्मानाबाद हत्या

गुरूवारी रात्री 7:30 दरम्यान ही हत्या झाली असून याबाबत पोलिसांकडून कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर किती लोकांनी मारले हे देखील समजलेले नाही.

घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती

By

Published : Sep 6, 2019, 8:26 AM IST

Updated : Sep 6, 2019, 2:20 PM IST

उस्मानाबाद- शहरातील बस स्थानकाच्या जवळ असलेल्या मुख्य रस्त्याच्या शेजारी एन्जॉय नेट कॅफेमध्ये एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दशरथ पवार (रा. घाटंग्री) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

हेही वाचा - गौरी-गणपतीच्या सणानिमित्त भाज्यांचे दर गगनाला भिडले

गुरूवारी रात्री 7:30 दरम्यान ही हत्या झाली असून याबाबत पोलिसांकडून कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर किती लोकांनी मारले हे देखील समजलेले नाही. उपचारासाठी पवारला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच सेतू सुविधा केंद्र बंद, कागदपत्रांसाठी नागरिकांना करावी लगणार प्रतिक्षा

Last Updated : Sep 6, 2019, 2:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details