महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Reservation Protest : बीडनंतर आता धाराशिव जिल्ह्यातही संचारबंदी लागू, कर्नाटकची बस उमरग्यात पेटविली! - मराठा आरक्षण

Maratha Reservation Protest : मराठा समाजाकडून धाराशिव जिल्ह्यातही हिंसक आंदालन करण्यात येत आहे. आंदोलकांनी कर्नाटकमधील एसटी बस पेटवली. बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली होती.

Maratha Reservation Protest
Maratha Reservation Protest

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 8:12 AM IST

Updated : Oct 31, 2023, 9:23 AM IST

धाराशिव Maratha Reservation Protest :सरसकट मराठा आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाकडून हिंसक आंदोलन करून खाजगी आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान होत असल्यानं आज धाराशिव जिल्ह्यातही संचारबंदी करण्यात आलीय. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यात हिंसक वळण लागलंय. एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांमुळं धाराशिव जिल्हा हादरलाय. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय.

संचारबंदीत काय सुरू राहणार :

  • शासकीय / निमशासकीय कार्यालये.
  • दूध वितरण.
  • पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना
  • सर्व बँका,
  • दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना.
  • रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था यांना सुट दिली आहे.
  • पाचपेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येण्यास मज्जाव : धाराशिव जिल्ह्यातही पुढील आदेशापर्यंत सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयं, दुकानं, आस्थापना यांना संचारबंदी लागू राहणार आहे. तसंच या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येता येणार नाही. यासोबतच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत.
  • उमरगा तालुक्यातील तुरोरी इथं कर्नाटकची बस पेटवली : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी इथं कर्नाटकमधून उमरग्याकडं जाणारी कर्नाटकमधील एसटी बस आंदोलकांनी पेटवली. विशेष म्हणजे बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली होती. ही बस कर्नाटकातील भालकीहून पुण्याला जात होती. या बसमध्ये 39 प्रवाशी होते.
  • आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण : मराठा आंदोलनाला सोमवारपासून राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलंय. एसटी बसेस तसंच शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांना आग लावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. काही ठिकाणी शासकीय कार्यालयांवरही दगडफेक करुन आग लावण्याचे प्रकार घडले. तसंच शासकीय आणि खासगी कार्यालयांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

हेही वाचा :

  1. Maratha reservation Live Updates Today: शाहू महाराज जालन्याकडं रवाना, मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढणार?
  2. Maratha Reservation Protest : बीडमध्ये संचारबंदीसह इंटरनेट सेवा बंदचा दुसरा दिवस, जिल्ह्यात तणावाची स्थिती
  3. Maratha Reservation Protest : राज्यात हालचालींना वेग! शिंदे-फडणवीसांची रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक
Last Updated : Oct 31, 2023, 9:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details