उस्मानाबाद- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी गुरुवारी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. ते खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त तुळजापूर येथे आले होते.
राज्यपाल कोश्यारींनी घेतले श्री तुळजाभवानीचे दर्शन - Tulaja Bhawani devi at Tuljapur
खंडग्रास सूर्यग्रहण यानिमित्त तुळजाभवानी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्याप्रमाणेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी देखील महाराष्ट्राची कुलदेवता आई श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
खंडग्रास सूर्यग्रहण यानिमित्त तुळजाभवानी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्याप्रमाणेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी देखील महाराष्ट्राची कुलदेवता आई श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वमर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे, तहसीलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे, मंदिर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती.