उस्मानाबाद- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षीचा 60 वा महाराष्ट्र दिन उस्मानाबादमध्ये साधेपणाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पार पडला.
महाराष्ट्र दिन: राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते साधेपणाने ध्वजारोहन संपन्न - संजय बनसोडे बातमी
पालकमंत्री शंकर गडाख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार व राजशिष्टाचार विभागाच्या मान्यतेने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
पालकमंत्री शंकर गडाख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार व राजशिष्टाचार विभागाच्या मान्यतेने राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमास केवळ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्यासह काही मोजकेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.