उस्मानाबाद -जिल्ह्यात गेली चार दिवसापासून सतत संततधार पाऊस पडतो आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षापूर्वी तुळजापूर-सोलापूर महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग करतेवेळी पूर्व बाजूच्या शेतातून पाण्यास वाहून जाण्यासाठी वाट केली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शेतातील पाण्याला नाही वाट; कंत्राटदाराच्या चुकीने शेतकऱ्यांचे नुकसान - farmer loss due to heavy rain news
शेतात पाणी थांबल्याने काढणीस आलेले सोयाबीन, कांदा, झेंडू द्राक्षाची फळबाग याचे मोठे नुकसान झाले. तर जवळच असेलल्या पेट्रोल पंपाला तळ्याचे स्वरूप आले आहे. तुळजापूर ते सोलापूर महामार्ग रस्त्याचे काम आयआरबी या कंपनीने केले आहे.
हायवे लागत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबत असून शेतातील पिके पाण्यात वाहून जात आहेत. शेतात पाणी थांबल्याने काढणीस आलेले सोयाबीन, कांदा, झेंडू द्राक्षाची फळबाग याचे मोठे नुकसान झाले. तर जवळच असेलल्या पेट्रोल पंपाला तळ्याचे स्वरूप आले आहे. तुळजापूर ते सोलापूर महामार्ग रस्त्याचे काम आयआरबी या कंपनीने केले आहे. या कंपनीने काम करण्यापूर्वी जुन्या रस्त्यावर शेतात पाणी थांबू नये म्हणून लहान लहान नाल्या काढण्यात आल्या होत्या. पावसाचे पाणी सहजगत्या वाहून रस्ताखालून जात होते. मात्र, त्यानंतर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग केला. हे करताना हायवेच्या पूर्व बाजुस तुळजापूर, घाटशिळ पायथा ते सिंदफळ झोपडपट्टी ब्रीजच्या पूर्व बाजूच्या शेतातील पाण्यास बाहेर जाण्यासाठी वाट करुन दिली नाही. त्यामुळे पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. सदरील पाणी शेतात थांबले. यामुळे शेतकऱ्यांचे पिके वाहून जात आहे. या पिकासोबतच जमिनीतील मती वाहून गेल्याने शेतीचे नुकसान होत आहे.