उस्मानाबाद -जमिनीच्या वादातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी झाली. यात चार महिलांसह नऊ जण जखमी झाले आहेत. भूम तालुक्यातील गणेगाव-पिंपळगाव येथे ही घटना घडली. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनीचा वाद; उस्मानाबादमध्ये दोन गटात तुफान हाणामारी
उस्मानाबादमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटातून हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात नऊ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेगाव पिंपळगाव शिवारातील कुळाच्या जमिनीवरून दोन गटात 1968पासून वाद सुरू होता. याच वादाचे रूपांतर बेफाम हाणामारीत झाले. यात चार महिलांसह नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहीजण मूळ गणेगाव येथील रहिवाशी आहेत. मात्र, ते परंडा तालुक्यातील जवळा या गावात स्थायिक झाले आहेत. तर काहीजण रोजंदारीसाठी पुणे येथे राहत आहेत. घटनेच्या दिवशी ते गणेगाव येथील शेतात आले असता प्रतिस्पर्धी गटाने त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यात दोन्ही गटातील लोक जखमी झाले. या जखमींमध्ये रेश्मा गुलाब मुजावर, परवीनबी शेख, बानुबी कासीम सय्यद, जुलेखां सलीम काझी या चार महिलांसह गुलाब मुजावर, कलिमुन सय्यद, विजय उर्फ बापूराव कांबळे, सत्तार अश्रूफखान पठाण, सौकत सय्यद जखमी झाले आहेत.
जखमींना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.