महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये विविध मागण्यांसाठी 'लहुजी शक्ती सेने'चा एल्गार मोर्चा - अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विविध मागण्यासाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला.

उस्मानाबादमध्ये विविध मागण्यासाठी 'लहुजी शक्ती सेने'चा एल्गार मोर्चा

By

Published : Jul 30, 2019, 9:52 PM IST

उस्मानाबाद- येथे आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

उस्मानाबादमध्ये विविध मागण्यासाठी 'लहुजी शक्ती सेने'चा एल्गार मोर्चा

या निवेदनात असे म्हटले आहे की, मातंग समाजावर वेळोवेळी अन्याय झाला आहे. त्याचबरोबर हा अन्याय अत्याचार आजही सुरू आहे. मातंग समाज अजूनही न्यायापासून वंचित आहे. त्यामुळे आम्हाला जातीयवादी लोकांपासून संरक्षण द्यावे, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहिर करावी, अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करवा, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत होणारा कर्जपुरवठा लवकरात लवकर सुरू करवा, मातंग समाजावर होणारे अन्याय रोखण्यासाठी कायद्यामध्ये स्पेशल अॅक्ट तरतूद करावी, त्याबरोबरच उस्मानाबाद शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजाने हा एल्गार मोर्चा काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details